रणबीर कपूरच्या ‘Animal Movie’ ने दिला प्रेक्षकांना सुखद झटका.

Animal Movie Poster
Spread the love

Animal Movie: रणबीर कपूरचा आगामी चित्रपट Animal चा ट्रेलर प्रदर्शित होताच लोक अभिनेत्याच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक करत आहेत. रणबीर कपूर पहिल्यांदाच येवढी हिंसक भूमिका सकरणार आहे. याआधीही तो नेहमीच रोमँटिक हिरो म्हणून चाहत्यांची मने जिंकत आला आहे. मात्र, रणबीरचा उग्र अवतार पाहून लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.

 

Animal Movie Poster

 

रणबीर कपूर झाला “Angry Young Man”

आतापर्यंत तुम्ही पडद्यावर फक्त रणबीर कपूरचा रोमान्स पाहिला असेल, पण आता तुम्हाला त्याचा उग्र अवतार पाहायला मिळेल. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ हा रणबीरचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे, ज्यामध्ये तो प्रथमच हिंसक भूमिकेत दिसणार आहे. ‘अ‍ॅनिमल’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने चाहत्यांना आनंद दिला. रणबीरच्या या भितीदायक पात्राने चाहत्यांना धक्का दिला आहे.

रणबीर कपूरला हिरोईनसाठी भांडण  करताना तुम्ही नेहमीच पाहिलं असेल, पण तो पहिल्यांदाच आपल्या वडिलांसाठी वेडेपणा करताना दिसणार आहे. वडिलांच्या प्रेमासाठी वेडा झालेला रणबीर सर्व मर्यादा ओलांडताना दिसणार आहे. ‘अ‍ॅनिमल’मधील अर्जुन सिंगच्या भूमिकेत रणबीर कपूरचा प्रत्येक Action  सीन पाहून चाहत्यांना अश्रू अनावर झाले होते. ट्रेलरमधील रणबीरचा हा लूक पाहून आता लोक त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘अ‍ॅनिमल’ ची स्टार कास्ट :

या चित्रपटात रणबीर कपूर व्यतिरिक्त अनिल कपूर (बलवीर सिंग), बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या भूमिका आहेत. चित्रपटात रश्मिका रणबीरच्या पत्नीची भूमिका साकारत आहे, तर अनिल त्याच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत खळबळ माजवताना दिसणार आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

https://marathivani.com/odi-world-cup-final-2023/

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आवळ्याचे फायदे… रोज खाल्यास राहाल ठणठणीत