ODI World Cup Final 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया कडून झालेल्या पराभवानंतर भारतीय टीम चा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर माझी भारतीय क्रिकेट पटू गौतम गंभीर याने टीका केली आहे.
IND vs AUS ODI World Cup Final: ICC विश्वचषक फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दारुण पराभव पत्करावा लागला आहे. संपूर्ण स्पर्धेत आघाडीवर असलेल्या संघाला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे भारताच्या करोडो चाहत्यांची मनं तुटली आहेत. विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला यावर चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाही. पण भारतीय संघ कुठे चुकला हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विश्वचषकातील पराभवानंतर गौतम गंभीरने कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले असून, त्याचा एक निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
रोहित शर्माचा कोणता निर्णय चुकीचा मानला गेला?
माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने अष्टपैलू रवींद्र जडेजाला सूर्यकुमार च्या आधी फलंदाजीसाठी बोलावल्यावर रोहित शर्माचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. गंभीर म्हणाला की, रोहितचा हा निर्णय मला समजलेला नाही. सूर्यकुमार यादवला रवींद्र जडेजाआधी फलंदाजीसाठी पाठवाईला हवे होते, जेणेकरून सूर्याला कोणतीही भीती न बाळगता खेळता येईल. जर सूर्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता तर रवींद्र जडेजा माझ्यामागे डाव सांभाळू शकेल हे त्याला माहीत असते. अशा स्थितीत तो मोकळ्या मनाने खेळला असता, पण रोहितने त्याला सातव्या क्रमांकावर टाकून दडपण आणले.