Realme GT 5 Pro लॉन्च होण्याच्या अगदी जवळ आहे. कंपनी 7 डिसेंबरला लॉन्च करणार असून त्यात फक्त तीन दिवस उरले आहेत. फोनच्या संदर्भात Realme कडून दररोज नवीन टीझर रिलीज केले जात आहेत. फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेट असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, नवीनतम टीझर मध्ये चार्जिंग वैशिष्ट्य, सुरक्षा , स्टोरेज इत्यादीबद्दल देखील सांगितले आहे.
Realme GT 5 Pro किंमत (अपेक्षित)
- चीनी ई-कॉमर्स पोर्टल Tmall वर Realme GT 5 Pro फोनची किंमत उघड झाली आहे.
- तुम्ही खालील इमेजमध्ये पाहू शकता की चीनमध्ये डिव्हाइसची किंमत CNY 3499 आहे.
- भारतीय रुपयांमध्ये पाहिल्यास, नवीन Realme GT 5 Pro सुमारे 41,800 रुपयांना उपलब्ध होईल.
Realme GT 5 Pro Features
Realme GT 5 Pro मध्ये 1TB स्टोरेज असेल जो टॉप व्हेरियंटसाठी आहे. फोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. हे USB 3.2 च्या रूपात येणार आहे. असे म्हटले गेले आहे की ते प्रति सेकंद 10GB पर्यंत ट्रान्सफर स्पीडला समर्थन करते. तर USB 2.0 फक्त 480 Mbps पर्यंत सपोर्ट करते. याशिवाय फोनमध्ये सुपर एआय असिस्टंट देखील मिळणार आहे.
आत्तापर्यंत समोर आलेल्या Realme GT 5 Pro च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये 6.78 इंच वक्र OLED डिस्प्ले असणार आहे. याचे 1.5K रिझोल्यूशन असेल. फोनला 144Hz रिफ्रेश रेट मिळणार आहे. हे 4500 निट्स च्या पीक ब्राइटनेससह येणार आहे. फोनमध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर येणार आहे. हे LPDDR5x RAM, UFS 4.0 स्टोरेज प्रकाराने सुसज्ज असेल. डिव्हाइसमध्ये 100W फास्ट चार्जिंगसह 5,400mAh बॅटरी असेल. 50W वायरलेस चार्जिंग देखील असेल.
कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असणार आहे. तर 50 मेगापिक्सेल 50MP LYT-808 प्राइमरी सेन्सर मागील बाजूस येणार आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन असेल. 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील असेल.
एतर पोस्ट बघा: रणबीर कपूरच्या ‘Animal Movie’ ने दिला प्रेक्षकांना सुखद झटका.